कुंभोज/वार्ताहर
कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्ते गटर्स व मूलभूत सुविधा करण्यासाठी महत्त्व देणार आहे. तर, माधवी माळी यांची नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल कुंभोज गावच्या विकासासाठी आमदार फंडातून त्यांना दहा लाख रुपये निधी देत असल्याची घोषणा आमदार राजू बाबा आवळे यांनी केली. ते कुंभोज ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी माधवी नंदकुमार माळी यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
कुंभोजच्या माजी सरपंच सरिता परीट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदी माधवी माळी यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडलाधिकारी मापसेकर यांनी या निवडीची घोषणा केली. सरपंचपदी माधवी माळी यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचा सत्कार विद्यमान आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. कुंभोज ग्रामपंचायत यांच्यावतीने आमदार राजू आवळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी एम माळी, विक्रमसिंह सेवा सोसायटीचे चेअरमन श्रीकांत माळी, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी,सचिन कोळी,विजय भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर, ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक आर सी पाटील व आभार प्रदर्शन कलगोंडा पाटील यांनी केले.