प्रतिनिधी / गगनबावडा
लखमापूर ( ता.गगनबावडा ) येथील कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरण क्षेत्रात आजअखेर ६८२५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून विद्युत निर्मितीसाठी 350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे.
गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यातील हजारो हेक्टर जमिन ओलिताखाली आणणारा हा गगनबावडा तालुक्यातील लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. सद्या धरणात 2.71 टि.एम.सी इतका पाणीसाठा झाला आहे. उन्हाळयात बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी खोरीतील गावांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होतो. येथील पर्जन्यमापन केंद्रात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ५८ मिलीमिटर तर आजअखेर ६८२५ मिलीमिटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.
नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे असे आवाहन शाखा अभियंता अभय हेर्लेकर यांनी केले आहे. दरम्यान गगनबावडा तालुक्यात पडलेल्या दमदार पावसाने कोदे, अणदूर व वेसरफ ही सर्वच धरणे यापूर्वीच पुर्ण क्षमतेने भरली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









