प्रतिनिधी / वाकरे
करवीर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पाच हजार कोरोनाबाधित रुग्णसंख्या पार झाली असून १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या” माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला सर्वांनी साथ द्यावी, शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी जागरूक राहावे असे आवाहन कुंभी कासारीचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कुडीत्रे (ता. करवीर ) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आणि कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डी.सी.नरके विद्यानिकेतनमध्ये सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी चेअरमन नरके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर होते.चेअरमन नरके यांनी कुंभी कासारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पन्हाळा पब्लिक स्कूल येथे पहिले कोवीड सेंटर,कोतोली येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दुसरे सेंटर आणि कुडीत्रे येथे तिसरे कोविड केअर सेंटर सुरू केल्याचे स्पष्ट केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









