वार्ताहर / पंढरपूर
भीमा नदीला महापूर आल्याने नदी तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. दूर्घटनेतील मृत झालेल्या कुटुंबियांची खा.संभाजीराजे छञपती यांनी भेट घेवून शासनस्तरावरती मदत करण्यासाठी पाठपूवठा करण्यासंदर्भात आश्वासन दिले.
संभाजीराजे छञपती यांनी झालेल्या दूर्घटनेबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडून माहिती घेतली. प्रशासकीय स्तरावर कुटुंबास काय मदत करता येईल याबाबत संभाजीराजे यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. मृत कुटुंबियांच्या घरी जाऊन संभाजीराजे यांनी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला आधार दिला. तसेच दूर्घटना झालेल्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नागेश भोसले, किरण घाडगे, विक्रम शिरसट, गणेश अंकुशराव, महादेव तळेकर, विश्वजीत भोसले आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









