प्रतिनिधी /तिसवाडी
कुंभारजुवे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विक्रम परब तर उपसरपंचपदी सचिन गावडे यांचा 5 विरूद्ध 4 मतांनी निवड झाली आहे.
सकाळी 10 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रीयेत सुरूवात झाली होती. त्यानंतर काही तासांनंतर सरपंचपदी विक्रम उर्फ विकी परब यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी सचिन गावडे यांची निवड झाली. त्यानंतर पंच सदस्या अर्चना परब, विंदा जोशी, सेजल नार्वेकर यांनी सरपंच विक्रम परब व उपसरपंच सचिन गावडे यांच्या बाजूने मतदान केले. तर पंच सुधीर फडते, सुरेश नाईक, अनुज नाईक व नंदकुमार शेट हे विरोधात राहिले. गावाच्या विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे नूतन सरपंच विक्रम परब व उपसरपंच सचिन गावडे यांनी यावेळी सांगितले.









