ऑनलाईन टीम / गोवा
कुंभारजुवा येथे एका भव्य कार्यक्रमात, माजी सरपंच आणि कुंभारजुआ पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य, सुरेंद्र नाईक यांनी आज गोवा ‘टीएमसी’ मध्ये प्रवेश केला. गोवा ‘टीएमसी’ महिला अध्यक्षा अविता बांदोडकर, गोवा ‘टीएमसी’ उपाध्यक्ष शिवदास नाईक आणि गोवा ‘टीएमसी’चे ‘कुंभारजुवा उमेदवार, समिल वळवईकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
पक्षात प्रवेश घेतल्यानंतर सुरेंद्र नाईक म्हणाले, ‘अनैतिक मार्गाने स्थापन झालेल्या भाजप सरकारच्या काळात मोठी बेरोजगारी आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे, नोकरी घोटाळ्यासह अनेक घोटाळे उघड झाले आहेत, ज्यात खुद्द भाजपचे मंत्री सामील आहेत आणि आम्हाला विश्वासार्ह पर्यायाची नितांत गरज आहे. जी आमच्याकडे आता ‘टीएमसी’ च्या रूपात आहे.”टीएमसी’ मध्ये सामील होण्याच्या कारणाची माहिती देताना सुरेंद्र नाईक यांनी टिप्पणी केली, ‘ ‘टीएमसी’ चे कुंभारजुवा उमेदवार समिल वळवईकर यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला आहे.
त्यांचे स्वागत करताना समिल वळवईकर म्हणाले, ‘अशा तळागाळातील प्रमुख नेत्याचा पक्षात समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या समावेशामुळे आमचे केडर आणखी मजबूत होईल.’ पदभार समारंभानंतर अविता बांदोकर यांनी नमूद केले की, “टीएमसी’वर बाहेरचा पक्ष असल्याचा आरोप होत आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष काही गोव्यात तयार झालेले नाहीत, “टीएमसी’ हा इतर पक्षांप्रमाणेच राष्ट्रीय पक्ष आहे, गोवा”टीएमसी’ हा गोव्याचा आणिगोमंतकीयांचा पक्ष आहे. गोवा”टीएमसी’ नवीन सदस्यांचे मनापासून स्वागत करते आणि गोव्यात ‘नवी सकाळ ’ आणण्याच्या त्यांच्या परिश्रमाची त्यांना खात्री आहे.









