प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुलवाडा, कुंकळ्ळी येथील स्वातंत्र्यसैनिक यशवंत विठोबा देसाई (वय 85) यांचे रविवार 30 रोजी कुलवाडा येथील निवासस्थानी दुपारी अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याचदिवशी सायंकाळी कुलवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी पुष्पा देसाई, तीन विवाहित पुत्र वीरेंद्र उर्फ विदेश, विक्रांत आणि विनोद देसाई, कन्या शुभांगी देसाई, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. कुंकळ्ळी पालिकेचे नगरसेवक व कुंकळ्ळी एज्युकेशनल सोसायटीचे चेअरमन वीरेंद्र उर्फ विदेश देसाई यांचे ते वडील व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भगिनी सौ. वीना विदेश देसाई यांचे ते सासरे होत. त्यांना स्वातंत्र्यसैनिक या नात्याने यापूर्वी गोवा राज्य पुरस्कार लाभला होता तसेच चिफ्टन मेमोरियल कमिटी, बाळ्ळी रणसंग्राम प्रति÷ान, कुंकळ्ळी-बाळळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता.









