वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या क्रीडा संकुलात (साई) 16 जूनपासून आयोजित केलेल्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघासाठीच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराकरीता शनिवारी हॉकी इंडियाने 40 हॉकीपटूंची निवड जाहीर केली आहे. सदर शिबिर 63 दिवसांचे राहिल.
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने गेल्या महिन्यात युरोपचा दौरा केला. या दौऱ्यात बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्समधील क्लब संघाबरोबर 5 सामने खेळविले गेले. या प्रशिक्षण शिबिरात निवड करण्यात आलेल्या हॉकीपटूंना प्रशिक्षक सी. बी. जर्नादन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.









