रशियाच्या सैन्याने घेतली माघार ः बुकाच्या दफनभूमीत मिळाले 280 मृतदेह
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला रविवारी 39 दिवस पूर्ण झाले आहेत. तर रशियाच्या सैन्याने माघार घेतल्याने राजधानी कीव्हवर आता पुन्हा युक्रेनने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. युक्रेनचे सैन्य रशियाचे सैन्य कीव्हमधून बाहेर पडल्यावर शहरात शिरल्यावर त्यांना तेथे दिसून आलेली स्थिती अंगावर काटा आणणारी हीत. कीव्हच्या रस्त्यांवर मृतदेहांचा खच दिसून येत होता, तसेच तेथे नृशंस कत्तल झाल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
कीव्ह शहराच्या एकाच गल्लीमध्ये 20 मृतदेह सापडले आहेत. येथे एका सामूहिक दफनभूमी सापडली असून तेथे 280 मृतदेह आढळून आले आहेत अशी माहिती बुका शहराच्या महापौरांनी दिली आहे. कीव्ह, बुकामधून समोर आलेली छायाचित्र मानवतेला हादवरून टाकणारी आहेत.

युक्रेनचे सैन्य अत्यंत खबरदारीपूर्वक कीव्ह शहरात प्रवेश करत आहे. एकेकाळी झगमगाटात बुडालेले हे शहर आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या रस्त्यांवर मृतदेह असून युक्रेनच्या सैन्याला ते हटविताना मोठी काळजी घ्यावी लागत आहे. या मृतदेहांमध्ये स्फोटके पेरलेली असण्याची भीती आहे. याचमुळे या मृतदेहांना हटविण्यासाठी सैन्य तारेचा वापर करत आहे.
कीव्ह शहराला लागून असलेल्या बुका भागात स्थिती अधिकच भयाण आहे. युक्रेनच्या सैन्याने तेथे नियंत्रण मिळविले आहे. रशियाच्या सैन्याने या क्षेत्रातून माघार घेतल्यावर होस्टोमेल येथील एंटोनोव्ह मिवानतळावर युक्रेनचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. बुकामधील अनेक गल्ल्या आणि रस्त्यांवर मृतदेह पडलेले आहेत. बुकामध्ये रशियाच्या सैन्याने विनाकारण लोकांच्या हत्या केल्या असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या सैनिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव शहरात अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले असून संशयास्पद वस्तूंचे निरीक्षण केले जात आहे.









