नाशिक / प्रतिनिधी :
देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाल्यांनतर शेतीमाल थेट परराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाल्याने आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोनवेळा रेल्वे सुरु सोडण्याला रेल्वेने परवानगी दिली आहे.
आगॅस्ट महिन्यापासून सुरु झालेल्या पहिल्या किसान रेल्वेला तीन आठवड्यात शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.त्यामुळे ही रेल्वे आठवड्यातून दोनदा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तीनदा धावलेल्या किसान रेल्वेने पहिल्या फेरीत 7 ऑगस्टला 73 टन, 14 ऑगस्ट 98 तर 21 ऑगस्टला 151 टन शेतमाल वाहातूक झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून मिळत असल्याने किसान रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने यापुढे ही रेल्वे आठवड्यातून मंगळवारी व शुक्रवारी देवळाली रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहे.
- कोल्हापूर : 5 बोगी शेतमाल
- सोलापूर : 2 बोगी शेतमाल
- नाशिक : 10 बोगी शेतमाला
- एकूण : 17 बोगी कृषिमाल
शेतमाल विक्रीचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा शेतकऱ्यांना व्हावा, खरेदी – विक्री प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी शेतमाल खरेदी विक्री प्रक्रिया करणारी नोडेल एजन्सी नाफेडच असावी.जर नाफेड एजन्सी असली तर शेतकऱ्यांना परराज्यातील बाजारभावाची रक्कम थेट शेतकऱ्यांना मिळून आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होण्यास मदत होईल. हेमंत गोडसे,खासदार नाशिक.








