बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त कोरे गल्लीतील युवा व बालगोपाळ यांच्यावतीने यावषी शिवाजी महाराजांच्या सिंहगर्जनेची व बुद्धिमत्तेची साक्ष देणारा दिल्ली येथील लाल किल्ला साकारण्यात आला होता. विशेष म्हणजे हा किल्ला मातीऐवजी थर्माकोलने तयार करण्यात आला होता. या किल्ल्याचे उद्घाटन गल्लीतील पंचमंडळी व ज्ये÷ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी गल्लीतील समाजसेवक, महिला मंडळ व बालचमू उपस्थित होते.
कोरे गल्लीतील बालगोपाळांच्या आणि दुर्गवीर प्रति÷ान यांच्यावतीने गड-किल्ले संवर्धन छायाचित्रे प्रदर्शन दि. 13 व 14 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन भरविण्याचा मुख्य उद्देश असा की, गेल्या 350 वर्षांपासून आजही आपले गड-किल्ले शाबूत आहेत. मात्र आजची परिस्थिती पाहता येणाऱया पुढील काळात किल्ल्यांची बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये, किल्ले हे इतिहासाची साक्ष देणारे आहेत. त्यामुळे आजच्या पिढीने किल्ल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याने कोरे गल्लीत किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.









