मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
कृषी खात्यात काम करणाऱया एका महिलेने किल्ला तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. आजाराला कंटाळून तीने आपले जीवन संपविले असावे, असे पोलिसांनी सांगितले. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सुशीला दुर्गाप्पा होसकोटी (वय 54, मुळच्या रा. होसकोटी, ता. कित्तूर, सध्या रा. सुभाषनगर) असे त्या महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत ही घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस येताच मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
सुशीला यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला. पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी खात्यात सेवा बजावणाऱया सुशीला मधुमेह व अतिरक्तदाबाने त्रस्त होत्या. त्यामुळेच त्यांनी आपले जीवन संपविले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला.









