शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर
मुंबई/प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत येत आहे. सोमय्या ठाकरे सरकार मधील मंत्र्यांवर घोटाळे केल्याचे आरोप करत आहेत. त्यांनी याआधीही अनेक नेत्यांची नवे घेतली आहेत. आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी सोमवारी मी एका शिवसेनेचा नेता आणि एक राष्ट्रवादीचा मंत्री यांच्या घोटाळ्यांची माहिती नावासकट देणार असल्याचे म्हंटल आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
किरीट सोमय्या यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. तर दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे., असे ते म्हणाले. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.








