प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट होत. सोमय्या यांना जिल्हा बंदीचे आदेश लागू केले आहेत. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांना जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.
दरम्यान सोमय्या यांच्या निवास्थानाच्या परिसरात पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. घोटाळेबाज सरकराने राज्याची वाट लावली आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. माझं कितीही तोंड दाबले तरी मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असे संतप्त मत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे.









