दापोली : प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मुरुड येथे पालकमंत्री अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप करून ते प्रतिकात्मकरित्या तोडण्यासाठी आज दापोलीत आलेल्या माजी खा. किरीट सोमय्या यांचा हातोडा रथ दापोली पोलिसांनी दापोली शहरातच अडवला.
यानंतर दापोली पोलिसांनी FIR घेण्यास नकार दिल्याचा आरोप करून किरीट सोमय्या व निलेश राणे यांनी दापोली पोलिस स्थानकाच्या पायरीवरच आंदोलन केले. हे आंदोलन रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्यावर पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप केला.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. गाड्यांची गर्दी झाल्यामुळे दापोलीतील नागरिकांचे अतोनात हाल झाले.