नवी दिल्ली
बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी चेअरपर्सन किरण मजुमदार शॉ यांची 2020 सालासाठी जागतिक उद्योजक पुरकारासाठी निवड करण्यात आली आहे. 41 देशातील 45 नामांकनामधून त्यांची निवड झाली आहे. किरण शॉ या अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱया तिसऱया भारतीय बनल्या आहेत. यापूर्वी कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक (2014) आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती (2005) यांनी मानाचा पुरस्कार प्राप्त केला होता. 4 जून रोजी त्यांची 2020 जागतिक स्तरावरच्या उद्योजक म्हणून निवड करण्यात आली.









