वार्ताहर / जैतापूर
राजापूर तालुक्यातील बाकाळे गावात दोघा भावांवर सुऱयाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गणेश सीताराम पवार (35, बाकाळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत प्रकाश पवार (32, बाकाळे) यांचे वडील व पत्नी गुरूवारी सकाळी 6 च्या सुमारास गणेश पवार याच्या घरासमोरील पायवाटेने जात होते. यावेळी गणेशने शिविगाळ केली. त्या दोघांना शिव्या का दिल्या याबाबत प्रशांत आणि त्याचा भाऊ या दोघांनी गणेश याच्याकडे विचारणा केली. यावर गणेश याने शिविगाळ करत घरातून मासे कापण्याचा सुरा आणून प्रशांतच्या डोक्यावर आणि मानेवर वार केला. त्यानंतर त्याच्या भावाच्याही डोक्यावर सुरा मारून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.









