बेन ऍण्ड कंपनीच्या अहवालात स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाचा किरकोळ ई बाजार तेजीने विकसित होणार असल्याचे संकेत असून 35 कोटी खरेदीदारांच्या सोबत मिळून हाच व्यवसाय आगामी 2025 पर्यंत 100 ते 120 अब्ज डॉलर्स सकल वस्तु मूल्यावर(जीएमव्ही) पोहोचण्याचा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. हा अहवाल बेन ऍण्ड कंपनीकडून सादर करण्यात आला आहे.
सदर अहवाल तयार करण्यासाठी बेन ऍण्ड कंपनीने फ्लिपकार्टची मदत घेत 850 अब्ज डॉलर्स मूल्याचा भारतामधील किरकोळ बाजार हा जगातील चौथा मोठा बाजार असल्याचे सांगितले आहे. परंतु यातील सर्वात मोठा हिस्सा हा असंघटीत क्षेत्राचा आहे. यामध्येच बाजारात ई किरकोळ संस्था आणि भारतीय खरेदीदारांवर हा प्रभाव वाढत आहे. मागील पाच वर्षात देशामधील ई किरकोळ व्यवसायामध्ये तीव्रतेने वाढ झाली असून आगामी काळातही ही वाढ वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. साधारण ऑनलाईन किरकोळ व्यवसाय 3.4 टक्क्मयांवर पोहोचला आहे.
ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत
स्वस्त आणि दुर्गम क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल डाटा, ऑनलाईन व्यवस्था आणि कंपन्यांकडून स्थानिक भाषांचा वापर करण्यासाठीच्या सुविधाही वाढल्या आहेत. वित्त वर्ष 2024-25 पर्यंत किरकोळ ई व्यवसायाशी संबंधीत असणाऱया ग्राहकांची संख्या ही 30 ते 35 कोटीच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत.









