नवी दिल्ली
किया मोटर्सने मागील वर्षात सेल्टॉस एसयूव्हीसोबत भारतीय बाजारात दाखल केली आहे. एसयूव्ही भारतात प्रसिद्ध राहिली आहे. किया सेल्टॉसला 9.69 लाख ते 16.99 लाखपर्यंत सादर केले होते. तर सध्या सेल्टॉसची किंमत 35 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे या कारची किंमत 9.89 लाख ते 17.34 लागा रुपये झालेली आहे. जानेवारी पासून ही नवीन किंमत लागू करण्यात येणार आहे.
सेल्टॉसची किंमत वाढल्याने पेट्रोल इंजिन मॉडेलची किंमत 9.89 लाख ते 14.09 लाख रुपये एक्स शोरुम किंमतीत उपलब्ध होणार आहे. या गाडीचे बेस मॉडेलची किंमत 20 हजार आणि सर्वोच्च मॉडेलची किंमत 30 हजारांनी वाढणार आहे. अन्य मॉडेलच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.








