नवी दिल्ली
ऑटो क्षेत्रातील कंपनी कियाने आपली नवी कार्निव्हल ही गाडी नुकतीच बाजारात लाँच केली आहे. सदरच्या बहुपर्यायी वाहनाची किंमत जवळपास 25 लाख रुपये (एक्स शोरुम) असणार आहे. सुधारित आवृत्ती रूपात आणलेल्या या गाडीसाठी कॉर्पोरेट लोगोत नव्याने सुधारणा करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लिमोसीन प्लस, लिमोसीन, प्रेस्टीज व प्रिमियम अशा चार प्रकारात ही गाडी उपलब्ध करण्यात आली आहे.









