ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
चीनने उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस पाठवली आहे. जपानी गुप्तहेरांच्या मदतीने अमेरिकेतील अभ्यासकांनी हा दावा केला आहे.
चीनमध्ये तीन कंपन्या कोरोना लसीची निर्मिती करत आहेत. त्यापैकी चीनने कोणती लस हुकूमशाह यांना पाठवली, त्या लसीची परिणामकता नेमकी किती आहे, यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. दोन ते तीन आठवड्यांपूर्वी चीन सरकारने किम जोंग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही लस दिली आहे.
चीनमध्ये सध्या सिनोवॅक बायोटेक, कॅनसिनो बायो आणि सिनोफार्म या कंपन्या कोरोना लसीची निर्मिती करत आहेत. चीनमध्ये सिनोफार्मची प्रायोगिक तत्त्वावरील लस 10 लाख नागरिकांनी घेतली आहे.









