वृत्तसंस्था/ टोकियो
रविवारी येथे झालेल्या टोकियो मॅरेथॉनमध्ये केनियाचा दुहेरी ऑलिंपिक चॅम्पियन धावपटू इलुद किपचोगेने विजेतेपद पटकाविले पण त्याला या स्पर्धेत यापूर्वीचा स्वतःचाच विश्वविक्रम मागे टाकता आला नाही.
टोकियो मॅरेथॉनमध्ये किपचोगेने 2 तास, 2 मिनिटे आणि 40 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकाविवले. या मॅरेथॉनमध्ये किप्रुटोने दुसरे स्थान मिळविताना दोन तास, 03 मिनिटे आणि 13 सेकंदाचा अवधी घेतला. इथोपियाच्या टोलाने तिसरे स्थान मिळविताना दोन तास, 04 मिनिटे आणि 14 सेकंदाचा अवधी घेतला. टोकियो मॅरेथॉनमध्ये केनियाच्या कोसगेईने विजेतेपद मिळविताना 2 तास, 16 मिनिटे आणि 02 सेकंदाचा अवधी घेतला. इथोपियाची बिकेरीने दुसरे तर इथोपियाच्या गेब्रेसेलासीने तिसरे स्थान मिळविले.









