बैठकीत घेतला निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाचा कित्तूर उत्सव साधेपणाने एकाच दिवसात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कित्तूर येथील विरभदेश्वर कल्याण मंडप येथे झालेल्या बैठकीत कित्तूर कलमठचे श्री मडिवाळ राजयोगेंद्र स्वामीजी, निच्चकी मठाचे पंचाक्षरी स्वामीजी, प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री, अशोक तेली, तालुका पंचायत अध्यक्षा चन्नम्मा होसमनी आदी उपस्थित होते.
कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य व जीव वाचविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा तीन दिवसांऐवजी एका दिवसांत साधेपणाने कित्तूर उत्सव साजरा करण्यात येईल, असे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी सांगितले. याला प्रत्येकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले.









