बाळेपुंद्री / वार्ताहर
कासवाची तस्करी करणाऱया तिघांना वनविभागाने धाड टाकून अटक केल्याची घटना बुधवारी कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावच्या वनविभागात घडली.
गिरीराज ईराप्पा कोन्नूर (वय 48), यल्लाप्पा मुदकप्पा डोकन्नावर (वय 29), व सन्नमंजाप्पा राजाप्पा बादगी (वय 52) सर्वजण धारवाड तालुक्यातील वेंकटापूर गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून वनविभागाने पाच कासव व एक दुचाकी तसेच कासवांना पकडण्याचे साहित्य ताब्यात घेतले आहेत.
याविषयी माहिती अशी की, कित्तूरनजीक तिगडोळी गावच्या वनविभागात कासवाची तस्करी होत असल्याचा सुगावा लागताच डीएचओ अमरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनाधिकारी संजय मगदूम, जी. सी. मिर्जी, आरएफओ श्रीनाथ कडोलकर, अजय भास्कर, प्रकाश किरबनकर, गिरीश मेकैद यांनी धाड घालून वरील आरोपींना अटक करून कासव ताब्यात घेतले. बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.









