प्रतिनिधी / घुणकी
कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर गेली सहा महिने दिवस रात्र कार्यरत असलेला किणी टोल नाक्यावरील तपासणी नाका मा जिल्हाधिकारी यांचे आदेशाने बंद करणेत आला आहे. नेहमी मोठी गर्दी. वादावादीचे ठिकाणी आज शुकशुकाट जाणवत होता. राष्ट्रीय महामार्ग वरील किणी ( ता. हातकणंगले ) येथील टोल नाकयाजवळ गेली सहा महिने जिल्हा आपत्ती व्यवस्थापणा कडून संगणकीय प्रणालीसह अद्यावत असा तपासणी नाका सुरु केला होता. पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणहून कोल्हापूर जिल्हयात प्रवेश करनेचा प्रमुख मार्ग असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील या तपासणी नाक्यावर वाहनासह दिवसरात्र प्रवाशांची मोठी गर्दी नित्याची बनली होती.
देश व राज्य भरातून येणाऱ्या प्रवाशांचे ई पास तपासणीसह त्यांचे जाणेचे ठिकाण. वैद्यकिय तपासणीसाठी टोकण देनेचे काम इथून चालत होते. आपत्ती व्यवस्थापणाच्या कर्मचाऱ्यासह पोलिस प्रशासन. वैद्यकिय पथक असे मोठ्या प्रमाणावर गेली सहा महिने कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी शासनाच्याअन् लॉक-४ मध्ये जिल्हा प्रवेश बंदीबाबत निर्बंध हटवले ने या तपासणी नाक्यावरील आपत्ती व्यवस्थापण कर्मचारी पोलिस पथक वैद्यकिय पथक यांना मा जिल्हाधीकारी यांनी आदेश काढून तपासणी नाका बंद केला आहे.
तर आता जिल्हयात प्रवेश करणाऱ्या इतर ठिकाणहून येणाऱ्या प्रवाशी व नागरिका बाबत प्रत्येक गावातील स्थानिक दक्षता समितीने सतर्क राहून जबाबदारीने कोरोना महामारीशी मुकाबला करणेबाबत आवाहन व सूचना करणेत आल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









