प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा-हिंडलगा येथील एका तरुणाच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून तो डायलेसीसवर आहे. घरची हलाखीची परिस्थिती त्यातच हा आजार जडल्याने त्या गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्या तरुणाला किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, अत्यंत गरीब असल्यामुळे हा खर्च झेपणे अवघड असून मदत करावी, असे आवाहन त्या तरुणाच्या कुटुंबाने केले आहे.
सुळगा-हिंडलगा येथील हालाप्पा निंगाप्पा उचगावकर (वय 28) याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. त्यामुळे त्याला डायलेसीस करावे लागत आहे. आता ‘जीव सार्थके’ या संस्थेच्या माध्यमातून त्याची किडनी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित संस्थेने किडनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो खर्च परवडणारा नाही. हालाप्पाचे वडील विकलांग आहेत तर त्याची आई घरकाम करून उदरनिर्वाह करत आहे.
केएलई हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी मदत करावी, असे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे. मदत करणाऱयांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक खाते क्रमांक 20196489279, आयएफएससी-एसबीआयएन 0015453 यावर मदत करावी, असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9535967658 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.









