ब्रिटनमध्ये एका प्लंबर स्वतःच्या मनमानी रेटलिस्टमुळे चर्चेत आला आहे. हा प्लंबर एका विद्यार्थ्याच्या घरात पोहोचला आणि एका तुटलेल्या पाइपला नीट करण्यासाठी प्लंबरने 4 लाख रुपयांचे बिल तयार करून दिले. हे बिल पाहून एश्ले डग्लस नावाचा विद्यार्थी गांगरूनच गेला.
23 वर्षीय एश्ले हैंट्स येथे राहतो. माझ्या किचनमध्ये सिंकमधील पाइप तुटल्याने पाणी भरले होते. यामुळे एम पीएम प्लंबर सर्व्हिसचा प्लंबर मेहदी पैरवीला त्वरित बोलाविले. प्लंबरला प्रारंभीच दुरुस्तीचा खर्च विचारला, पण त्याने माझ्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष करत स्वतःचे काम सुरू ठेवले. पण काम पूर्ण होताच प्लंबरने माझ्या हातात सुमारे 3900 पाउंड्सचे (सुमारे 4 लाख रुपये) बिल सोपविले. तो त्याचवेळी माझ्याकडून पैसे मागू लागल्याचे एश्लेने सांगितले आहे.
मी माझ्या सेवेचे एक तासासाठी 1 कोटी देखील मागू शकतो. माझ कौशल्य आणि प्राविण्याच्या हिशेबाने पैसे आकारत असल्याचा दावा प्लंबर मेहदीने केला आहे. हे काम सहजपणे 250 पाउंड्स म्हणजेच 25 हजारांमध्ये होऊ शकले असते. संबंधित प्लंबर विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट असल्याचे एका जाणकाराने म्हटले आहे. तर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा विचार एश्लेने चालविला आहे.









