बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान बऱयाच दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ चित्रपटासाठी काम करतोय. मात्र अडथळे कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आतापर्यंत अनेकदा वेगवेळ्या कारणांमुळे शाहरुख खानच्या ‘पठाण’चे शूटींग पुढे ढकलले. त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रकार घडला आहे. पठाण चित्रपटांचं शुटींग आतापर्यंत वेगवेळ्या कारणांमुळे थांबलं आहे. आधी कोरोना, नंतर शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि आता ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या धोक्यामुळे ‘पठाण’ च्या शूटिंगमध्ये अडथळा आला आहे. शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग स्पेनमध्ये करणार होता, ते आता होणार नाही. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये स्पेनमध्ये शूटिंग होणार होते. इथे चित्रपटाची दोन गाणी आणि काही ऍक्शन सीन्स चित्रित होणार होते. मात्र तसं झाले नाही, कारण शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे तो ब्रेकवर होता. आता जानेवारीत शुटींग करण्याचं ठरवलं होतं, मात्र स्पेनमध्ये कोरोना रुग्ण असल्यानं शुटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. आता शाहरुख खानला पठाण लूकमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
Previous Articleभविष्य
Next Article देशाची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या घरात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









