नेदरलँडच्या युवराज्ञींचा निर्णय
डच सिंहासनाच्या उत्तराधिकारी आणि नेदरलँडच्या युवराज्ञी ऐमालिया यींनी स्वतःला मिळणारा 14 कोटी रुपयांचा वार्षिक भत्ता स्वीकारण्यास नकार दिला आहे. 7 डिसेंबर 2021 रोजी मी 18 वर्षांची होणार आहे. कायद्यानुसार मला भत्ता मिळेल, पण याच्या बदल्यात काही तरी करेपर्यंत तो न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे ऐमालियाने म्हटले आहे.
ऐमालियाने या निर्णयाची माहिती नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांना पत्राद्वारे दिली आहे. हा कठिण काळ आहे. कोरोना संकटादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचमुळे महाविद्यालयीय शिक्षण पूर्ण करण्यापूव वारशादाखल प्राप्त या अधिकाराचा त्याग करत असल्याचे ऐमालियाने सांगितले आहे.
ऐमालिया ही नेदरलँडचे राजे एलेक्झेंडर यांची मोठी मुलगी आहे. अलिकडेच तिने स्वतःच्या हायस्कुल ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. डच प्रसारमाध्यमांनुसार ऐमालियाला भत्त्यादाखल 11 कोटी रुपये आणि राजघराण्याचा सदस्य म्हणून खर्चासाठी 2.6 कोटी रुपये मिळतात.









