वार्ताहर / कास
कोरोना लॉकडाऊनच्या काळात कास रोडवर धनदांडग्यांची अनधिकृत बांधकामे जोमात सुरु असुन प्रशासन मात्र कोमात गेले की काय असा प्रश्न उपस्थीत होत आहे. बेकायदा बांधकामे करण्यासाठी डोंगराची पोखरन करून अनाधिकृतरीत्या मुरूमाचे उत्खनन केले जात असल्याने येत्या काळात या निसर्ग संपन्न वर्ल्डहेरीटेज परिसरात सिमेंटचे जंगल ऊभे राहिल्यास नवल वाटायला नको अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.
जागतिक वारसास्थळ कास पठार बामणोली भांबवली धावली जुंगटी आटाळी पेट्री हा निसर्ग संपदेने नटलेला परिसर असुन येथील परिसराला निसर्गसंपदेमुळेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. या भागातील पर्यंटन वाढू लागताच धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट होऊ लागल्याने तीन वर्षापुर्वी पालकमंत्री विजयबापू शिवतारे व प्रशासन यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात कडक पाऊले उचलून कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
स्थानिकांनी रोजगारासाठी केलेली बांधकामे नियमीत व्हावीत आशी मागणी स्थानिकांची होती त्यांना कोर्टातही धाव घ्यावी लागाली मात्र अदयाप स्थानिकांची जुनी बांधकामे नियमीत झाली नसुन नवीन पर्यावरण पुरक नियमांमध्ये बांधकामे करण्यासाठी परवाणगीही मिळाली नसल्याने व कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने नवीन बांधकाम कर्जबाजारी होऊन करण्यासाठी स्थानिकांना धडकी भरत आहे
मात्र धनदांडग्यांच्या आनाधिकृत बांधकामांवर त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही व अदयाप त्यांची बांधकामे बेकाद्येशीर मातीचे उत्खनन करून जोमात सुरु आहेत. याकडे मात्र महसुल विभाग व प्रशासनाने जाणीक पुर्वक डोळेझाक केल्याचे दिसत आहे.
सांबरवाडी येथे सातारा तहसीलदार यांनी कास परिसरात अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे फलक तीन वर्षापुर्वी लावले आहे मात्र तीन वर्षात अनेक बांधकामे पुर्ण झाली व अदयाप अनेक सुरुच आहेत. मात्र एकावरही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाची भुमीकाच संशयस्फद असुन यामध्ये स्थानिकांची गोची होऊन धनदांडग्यांकडून पर्यावरणाला हानिकारक असणारे सिमेंट जंगल राजरोस पणे ऊभे राहत आहे.
कास रोड व परिसरातील बहुतांश जमीन धनदाडग्यांच्या घश्यात गेली असुन ते शेतजमीनीवर अॅग्रो टुरीझमच्या नावावर हॉटेल बंगले बांधत आहेत. तर अनेकजण दुमजली तिन मजली हॉटेल इमारती ऊभ्या करत असुन त्यासाठी मोठया प्रमाणात डोंगरांची पोखरूण माती व मुरूमाचे बेकादेशीर उत्खनन करत अनेक मोठमोठया वृक्षांची कत्तल केली जात आहे तर काहीनी रूदीकरण झालेल्या रोडच्या नाल्यात भिंती उभ्या करून रोड लगतच्या नाल्यात आतिक्रमण केल्याचे दिसत आहे.
कास रोड रूदीकरणांसाठी व कास तलावच्या धरणाची उंची वाढवण्यासाठी झाडांची मोठ्याप्रमाणात कत्तल झाली आहेच. आता धनदाडांगे हॉटेल बंगले बांधण्यासाठी त्यांच्या जमीनीतील झाडांची कत्तल चोरीचुपके करून डोगरांची पोखरन करत असल्याने भागातील पर्यावरणाची हानी होऊन येत्या काही वर्षात सिमेंटचे जंगल ऊभे राहण्याचे चित्र निर्माण झाले असल्याने याला जबाबदार कोण प्रशासन वेळीच बेकादेशीर बांधकांमांवर कारवाई करणार की डोळेझाक दुर्लक्ष करून धनदांडग्यांच्या बांधकामावर कारवाई टाळत एकप्रकारे मदतच करणार काय ? असे पर्यावरणप्रेमींतुन व्यक्त होत आहे.