पर्यटकांविना पडले ओस
वार्ताहर/कास
गेल्या सहा सात दिवसापासुन मोसमी पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे कास पठार वरील नैसर्गीक रंगीबेरंगी फुलांना बहर येवू लागला असुन फुलांची पठारवर उधळण पहायला मिळत असताना कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे पर्यटनबंदी कायम असल्याने कास पठार पर्यटकांविना प्रथम ओस पडल्याचे दिसुन येत आहे
दरवर्षी कास पठार वरील रंगीबेरंगी रानफुलांच्या बहराला सप्टे्बर महीन्यात मोठा बहर येतो. त्याच प्रमाणे याहीवर्षी मोसमी पावसाने सात दिवसापासुन उघडीप दिल्याने पठारवरील रानफुले बहरू लागल्याने सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचे गालीच्छे पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी फुलांची चादर तयार झाल्याचे दिसुन येत असून पठारावर गुलाबी तेरड्याला मोठा बहर आला असुन, गेंद सितेची, आस्वे, चवर रानहळद, कापरू, आम्री, सोनकी, रानगवार, निलिमा, आदी अनेक शेकडो विविध जाती प्रजातीच्या वनस्पतींच्या फुलांना बहर आला असुन रंगीबेरंगी फुलांचा पठारला आनोखा साज चढल्याचे दिसुन येत आहे.
जागतीक वारसास्थळ कास पुष्प पठार म्हणजे पर्यटकांसाठी आनोखी पर्वणीच. या पुष्प पठारला आठ वर्षापर्वी जागतीक पर्यटनाचा दर्जा मिळाला आणि पठार आपल्या नैसर्गीक अनमोल ठेव्याच्या जोरावर जगातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरले. या पठारवरील ‘नैसर्गीक रंगीबेरंगी रानफुलांच्या हंगामा काळात दरवर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक कास पठारला भेट देवुन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रद्रुभावामुळे पर्यटकांविना कास पठार फुलांनी बहरून गेल्याचे पहायला मिळत आहे
पठारवरील फुलांना बहर येवु लागला असुन रंगीबेरंगी फुलांनी पठार दरवर्षी प्रमाणे सजले आहे येत्या आठ दहा दिवसात फुलांचा मोठा बहर येण्याचे चित्र निर्माण झाले असुन सर्वत्र फुलांची चादर पहायला मिळेल – योगेश काळे, वनसमिती कर्मचारी
पठारवर पांढऱ्या निळया गुलाबी लाल पिवळ्या आदी विविध रंगी लहान मोठया फुलांना बहर आला असुन पठार वर फुलांचा आनोखा साज पहायला मिळत आहे मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पर्यटकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घेत कास पठारवर शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत येवु नये फुलांचा हंगाम आपण पुढील वर्षीही पाहु शकतो –अभिषेक शेलार,वनसमिती कर्मचारी
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









