वार्ताहर / कास
जागतिक वारसास्थळावरील नैसर्गिक रानफुलांनी अनेकांना भुरळ घातली असुन फुले ऊमलू लागली की कास पठारची देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाचे वेध लागतात. आज सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी पत्नीसमवेत कास पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.
कासवर अद्याप फुलांचे गालीचे तयार झाले नसले तरी काहीशी फुले उमलली आहेत. मात्र येथील ऊन वारा पाऊस धुके हिरवेगार डोंगर व आभाळाच्या छताखाली नटलेला निसर्ग पर्यटकांचे मन मोहून टाकत असल्याने फुलांची कमी भासत नाही. येत्या काही दिवसातच पठारवर फुलांचे गालीचे पहायला मिळतील अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. शनिवार रविवार या दोन दिवसांत दोन हजाराहुन आधिक पर्यटकांनी पठारला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला आहे.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी पत्नीसमवेत कास पठारला भेट दिली व येथील फुलांसह निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला त्यांना माजी वनपाल श्रीरंग शिंदे यांनी ऑफीस बाहेर लावलेल्या फोटोतील फुलांची माहिती करून दिली. त्यांचा सत्कार वनसमीतीच्या वतीने पठारचा फोटो शाल श्रीफळ देऊन सत्कार जावलीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष मारूती चिकणे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत सदस्य सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर आखाडे गोविंद किर्दत सोमनाथ बुढळे श्रीरंग शिंदे आदी. उपस्थीत होते. यावेळी जिल्हापोलिस प्रमुखांनी येथे अनमोल निसर्ग असुन समीतिच्या नियोजनबद्ध कामासह समिती पठारच्या प्रसारसह बचावही करतील अशा शब्दांत कौतुक केले आहे.









