वार्ताहर / कास
जागतीक वारसास्थळ कास पुष्प पठार च्या कडयाचा काही भाग पंधरा दिवसापुर्वी मुसळधार पावसामुळे ढासळला असुन यामध्ये अनेक मोठमोठी झाडे भुईसपाट झाली आहेत कोसळलेला कडा वाहनधारकांचे लक्ष वेधुन घेत आहे.
जांभ्या दगडाच्या काथळात विस्तीर्ण असं असलेल कास पुष्प पठार हे जगातील पर्यटकांचे पर्यटनस्थळ या पठार च्या चोहोबाजुला मोठामोठा कडा असुन या कडयाचा काही भाग अनेक ठिकाणी धोकादायक रित्या वर्षानुवर्ष उभा असुन त्यातीलच चिराडलेला कडयाचा भला मोठा भाग पावसामुळे कोसळला आहे कड्याच्या टोकावर धोकादायक ठिकाणी उभे राहुन फोटो सेशन करणाऱ्या पर्यटकांना साठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
कास पठारचा पुर्व बाजुचा कासाणी गावच्या हाद्धीतील कडयाचा भाग पंधरा दिवसापुर्वी मुसळधार पावसामुळे कोसळला आहे यामध्ये मोठमोठे वृक्ष भुईसपाट झाले असुन त्या ठिकाणी दगडांचा खच पडला आहे तर कडयाचा चिराडलेला काही भाग अदयाप धोकादायक रित्या उभा असुन कोसळलेला कडा कास रोडवरून व घाटाई रोडवरून जाणाऱ्या वाहनधारंकांच लक्ष वेधुन घेत आहे.
Previous ArticleISI एजंटला गुजरातच्या कच्छमधून अटक
Next Article माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन









