फोटो कॅप्शन–सध्या बंद ठेवण्यात आलेला कास तलाव परिसर
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. याच अनुषंगाने कास तलाव परिसरदेखील पर्यटकांसाठी आता बंद ठेवण्यात आला आहे.
सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱया कर्मचायांनी देखील आपल्या गावाची वाट धरली आहे. विशेषतः साताऱयातील अधिकतर नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी असतात त्यांनी देखील आता आपल्या गावाकडे परतले आहेत. पण काहींनी या परिस्थितीचे गांभीर्य तितक्या प्रमाणात घेतले नाही. आपण सुट्टीला आल्यासारखे ते सातारा परिसरात असणाऱया विविध पर्यटन ठिकाणी भेट देण्यास प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेत आता कास तलाव पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सर्वत्र बंद असून देखील मागील काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांची ये-जा सुरू होती याच पार्श्वभूमीवर हा परिसर सध्या बंद ठेवण्यात आला आहे.








