प्रतिनिधी/ सातारा
शहराला पाणी पुरवठा करणाया कास तलावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटली जाते.यावर्षी पाणीसाठा किती आहे याची पाहणी नुकतीच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, अभियंता द्विग्विजय गाढवे यांच्यासह अधिकायांनी केली.अकरा फुटावर असून पाणी कपातीचा निर्णय घेण्यासाठी 15 एप्रिल बैठक होण्याची शक्यता आहे.
सातारा शहराला कास तलाव, शहापूर उदभव योजना, कृष्णा नदी उदभव आणि महादरे तलाव या चार उदभवद्वारे पाणी पुरवठा केला जातो.सर्वात जुनी असलेल्या कास योजनेच्या पाणी पुरवठा दरवर्षी उन्हाळ्यात कमी होत असतो.शहराला टंचाई भेडसावु नये म्हणून सातारा पालिकेच्यावतीने उन्हाळी नियोजन करण्यात येते.सातारा पालिकेच्या पदाधिकायांनी नुकतीच कास तलावाची पाहणी केली.कास मधून प्रतिदिन साडेपाच लाख लिटर तर शहापूर योजनेतून साडे सतरा लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो.पंचवीस फूट साठवण क्षमता असलेल्या कास तलावात सध्या साडे अकरा फूट पाणी साठा शिल्लक आहे.तलावातील तीन पैकी पहिला व्हॉल्व्ह उघडा पडला आहे.दुस्रया व्हॉल्व्हद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्याचा कालावधी असून पालिका प्रशासनाला पाणी पुरवठा नियोजन करावे लागणार आहे. त्याकरता पाहणी केली असून दि.15,रोजी बैठक होऊन पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.









