अशी ऑफर कुठेच मिळणार नाही
जर तुम्ही घर खरेदीचे स्वप्न पाहत असाल तर तुमची ही इच्छा मोफत पूर्ण होऊ शकते. पण याकरता केवळ एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. या घरासाठी तुम्हाला हरक्यूलिस नावाचे कासव खरेदी करावे लागणार आहे. या कासवाची किंमत 8 कोटी 54 लाख 54 हजार 547 रुपये इतकी आहे.
सर्वात विशेष म्हणजे हा कासव 94 वर्षांचा आहे. या कासवाची खरेदी करणाऱया व्यक्तीला बोनस म्हणून विल्टशायरमध्ये एक टूमदार घर मोफत मिळणार आहे. या घरात चार बेडरुम आहेत. कासवासोबत मिळणारे हे ओल्ड डेअरी नावाचे घर देखील विशेष आहे. ही मालमत्ता विल्टशायरच्या ग्रेड 2 मध्ये नेंदणीकृत असून यात तीन मजल्यांवर 2600 चौरस फुटांपेक्षा अधिक राहण्याची जागा आहे.
94 वर्षांच्या कासवासोबत मिळणाऱया या घराच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये प्रवेश करताच एक भव्य हॉल दिसून येईल. जिना भोजन कक्षापर्यंत जातो, तर त्याखाली एक तळघर देखील आहे. हॉलमध्ये एक खुली चिमणी असून दोन्ही बगिचांचे दृश्य तेथून दिसून येते. मागील 14 वर्षांपासून कासव या घरात राहत आहे. कासवाच्या आहारत सॅलड, काकडीचा प्रामुख्याने समावेश आहे. पण त्याला टॉमेटो अधिक पसंत आहे.









