ऑनलाईन टीम / दावोसा :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, दोघांमध्ये काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली. तेव्हा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयारी दर्शवली. ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱयावर येणार आहेत. त्यावेळी या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारताने तो नाकारला होता. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही तिसऱया देशाने यात मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचे मोदी सरकारने सांगितले होते.
ट्रम्प म्हणाले, आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत व्यवसाय करतो. इतर काही मुद्यांवरही आम्ही एकत्र काम करतो. सध्याच्या काश्मीर प्रश्नावर आम्ही लक्ष्य ठेवून आहे. काश्मीर मुद्यावर जेवढी मदत आम्हाला करता येईल, तेवढी आम्ही करू, असेही त्यांनी इम्रान खान यांना सांगितले.









