ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये ‘अँटी फॅसिस्ट पीपल्स फ्रंट’ ही नवीन दहशतवादी संघटना सक्रिय झाली आहे. एका पोलिसाची हत्या केल्याची जबाबदारी या संघटनेने घेतली असून, आणखी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत एक दहशतवादी खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे दोन दहशतवादी अत्याधुनिक अमेरिकी एम-4 रायफली घेऊन उभे आहेत. एका पोलिसाच्या हत्येची माहिती देत ते आणखी हल्ला करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
अँटी फॅसिस्ट पीपल्स फ्रंट’ ही संघटना जैश-ए-महम्मदशी संबंधित असावी, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे. ही संघटना आता युवकांची भरती करू शकते, त्याकडेही सुरक्षा यंत्रणेकडून ठेवण्यात येत आहे.









