श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ात शुक्रवारी सैनिकांनी एका अज्ञात दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या जिल्हय़ातील मुमानहल खेडय़ात दहशतवादी लपलेले आहेत, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळताच सेनेच्या एका तुकडीने या भागात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सैनिकांनी त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात हा दहशतवादी ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तथापि, तो पाक प्रशिक्षित असावा, असे अनुमान आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.









