शोधमोहीम सुरूच – सुरक्षा दलांना चकमकीत मिळाले यश
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. पण हे दहशतवादी कुठल्या संघटनेशी संबंधित होते याची माहिती मिळू शकलेली नाही. दहशतवाद्यांच्या अन्य साथीदारांच्या विरोधात सोपोरमध्ये मोहीम सुरूच होती. खबरदारीदाखल या भागातील मोबाईल इंटरनेट सेवा रोखण्यात आली.
सोमवारी रात्री सोपोरच्या सीर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळताच मोहीम हाती घेण्यात आली होती. पण रात्रीचा वेळ असल्याने चकमक सुरू झाली होती. पण पूर्ण परिसराला घेरण्यात आले होते. मंगळवारी सकाळी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले, पण त्यांच्याकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता.
या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर परिसरात उशिरापर्यंत गोळीबार सुरूच होता. या मोहिमेत पोलिसांसोबत सैन्य तसेच सीआरपीएफचे पथक सामील आहे.









