बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या मोठय़ा पडद्यापासून दूर असली तरीही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. नर्गिस स्वतःच्या लव्ह लाइफबद्दल नेहमीच उघडपणे बोलत असते. नर्गिसने यापूर्वी अभिनेता उदय चोप्राला डेट केले होते. परंतु दोघांच्या ब्रेकअपला आता मोठा काळ उलटला आहे. अभिनेत्रीचे नाव आता नव्या व्यक्तीसोबत जोडले जात आहे.
42 वर्षीय नर्गिस आता एका काश्मिरी उद्योजकाला डेट करत आहे. टोनी बेग याच्यासोबत तिचे नाव जोडले जात आहे. दोघेही परस्परांसोबत अधिक वेळ घालवत असल्याचे बोलले जाते. हे नाते नवीन असल्याने नर्गिस यावर बोलणे टाळत आहे. तर मागील वर्षी नर्गिसने उदय चोप्रासोबतचे स्वतःचे नाते मान्य केले होते. तसेच बेकअपमुळे झालेले दुःखही व्यक्त केले होते. ब्रेकअपनंतर नर्गिसने भारत सोडून अमेरिकेत वास्तव्य करण्याचे पाऊल उचलले होते. सध्या देखील नर्गिस अमेरिकेतच राहत आहे.









