प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरातील डम्पिंग ग्राउंड वर अचानक एका दिवशी ५ कावळे मृत्यू पावल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर दापोलीकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन दापोलीतील पशु वैद्यकीय उपआयुक्त डॉ. लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
दापोली शहरातील डम्पिंग ग्राउंड वर एकाच दिवशी ५ कावळे मृतावस्थेत आढळून आले हे कावळे पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचं शवविच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त होईल यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे तोपर्यंत दापोलीकरांनी सतर्क राहावे कोणताही प्राणी-पक्षी बेवारस अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला तर त्याला हात लावू नये पशुवैद्यकीय दवाखान्याला कळवावे किंवा हातामध्ये ग्लोज खालून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन यावे असे आवाहन डॉ लोंढे यांची यांनी केले आहे
या कावळे मरण्याच्या बातमीची जोरदार चर्चा दापोली जोरदार सुरू आहे.









