निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दिली तंबी
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी येथील शहापूर पोलीस स्थानकात काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड झाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस अधिकाऱयांनी गुन्हेगारांना तंबी दिली आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्या यादीतील गुन्हेगारांना तंबी दिली. महानगरपालिकेची निवडणूक व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांना पोलीस स्थानकात बोलाविण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत शांततेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिकाऱयांनी दिला. या परेडमध्ये 70 हून अधिक गुन्हेगार सहभागी झाले होते.









