वृत्तसंस्था/ बेंगळूर
नुकतेच दिवंगत झालेले माजी अष्टपैलू बापू नाडकर्णी यांच्या सन्मानार्थ या सामन्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंनी दंडावर काळय़ा फिती बांधल्या होत्या. गेल्या शुक्रवारी त्यांचे वयाच्या 86 वर्षी निधन झाले.
भारतीय खेळाडू तिसऱया व अंतिम वनडेसाठी मैदानात प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी नाडकर्णी यांना मानवंदना म्हणून दंडावर काळय़ा फिती बांधल्या होत्या. 1955 मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि 1968 मध्ये याच संघाविरुद्ध त्यांनी शेवटचा सामना खेळला होता. चेन्नईमधील एका कसोटीत त्यांनी सलग 21 निर्धाव षटके टाकण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी त्यांचे पृथक्करण 32-27-5-0 असे अचंबित करणारे होते.