२१.१० टीएमसी पाणीसाठा, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे २० टक्के अधिक पाणीसाठा
प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी (दूधगंगानगर) येथील राजर्षी शाहू धरणात ८३.११ टक्के (२१.१० टी.एम.सी ) इतका पाणी साठा झाला आहे. गेले आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. मात्र धरणाची पाणी साठा क्षमता २५ टी.एम.सी. इतकी असल्याने धरण भरण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.
काळम्मावाडी हे जिल्ह्यातील बहुतांशी भागाला पाणी पुरवठा करणारे धरण असून या वर्षी थोड्याच कालावधीत धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे आज अखेर काळम्मावाडी धरण परिसरात २११० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर आज केवळ २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज धरणाच्या जलाशयाची पाणी पातळी ६४२.३० मीटर इतकी असून पाणीसाठा ५९७.६९२ द.ल.घ.मी म्हणजेच २१.१० टी.एम.सी. (८३.११ टक्के ) इतका झाला आहे. गतसाली धरण परिक्षेत्रात २७ जुलैला १५७८ मी.मीटर इतका एकूण पाऊस झाला होता. त्यावेळी जलाशयाची पातळी ६१८.१८ मीटर तर पाणीसाठा ४७३.५१४ द.ल.घ.मी . म्हणजेच १६.७२ टी.एम.सी (६५.८४ टक्के ) इतका झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सुमारे २० टक्के अधिक पाणी साठा झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









