सौंदत्ती-धारवाड रस्त्यावरील दुर्घटना : मृत दांपत्य सौंदत्तीचे
वार्ताहर / बाळेकुंद्री
कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव समोरून येणाऱया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सौंदत्ती शहरातील पती-पत्नीसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. हा अपघात सौंदत्तीहून धारवाडकडे जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील बुद्धिगोप्प गावाजवळ घडला.
हुबळी येथील ईस्पिळात डायलेसिसाठी जात असतानाच काळाने घाला घातल्याने इचंगी कुटुंबासह सौंदत्ती शहरावर शोककळा पसरली आहे. रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. रेवणसिद्यय्या इचंगी (वय 46) तर विजया इचंगी (वय 42) असे मयत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. व नागराज इचंगी (वय 30) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत नागराज हा रेवणसिद्यय्या यांचा लहान भाऊ होय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचंगी कुटुंब हे बुधवारी सकाळी आपल्या कारमधून विजया हिला डायलेसीस करून घेण्यासाठी सौंदत्तीमार्गे धारवाडला जात होते. याचवेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱया ऊसाची वाहतूक करणाऱया ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. कारची धडक इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.









