नवी दिल्ली
2020 मध्ये भारतात कार्यालयीन जागांचा विक्रमी व्यवहार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जेएलएल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात 2020 मध्ये भारतात 3.1 अब्ज डॉलर्सचे व्यवहार कार्यालयीन गाळय़ांच्या विक्रीच्या माध्यमातून झाल्याचे म्हटले आहे.
‘इंडिया रियल इस्टेट आऊटलुक-अ ग्रोथ सायकल’ नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये सदरची माहिती देण्यात आली आहे. 2020 च्या पहिल्या तीन तिमाहीमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद दर्शवला नाही. कारण त्या काळात भारतात कोरोनाचे प्रमाण अमर्याद वाढलेले होते. पण शेवटच्या तिमाहीत मात्र व्यवहारांमध्ये मोठी वाढ दिसून आली. कार्यालयीन जागांच्या व्यवहारात 2020 मध्ये पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.









