मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे प्रभारी दाखल, कोअरकमिटी बैठकीतही चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी येथील गांधीभवनमध्ये होणाऱया भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी पक्षाचे वरि÷ नेते बेळगावात दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री येथील खासगी हॉटेलमध्ये कोअर कमिटीची बैठक झाली असून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील व पक्षाचे कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी भाग घेतला होता. पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर अरुण सिंग प्रथमच कर्नाटक दौऱयावर आले आहेत.
कोअरकमिटी व कार्यकारीणीच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र पक्षाचे झेंडे, पताके लावण्यात आले असून महात्मा गांधीभवनमध्ये यासाठी तयारी करण्यात आली आहे. भाजपचे अनेक बडे नेते शुक्रवारी बेळगावात दाखल झाले असून रात्री 8.15 वाजता युके-27 हॉटेलमध्ये कोअरकमिटीच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती.
कोअरकमिटीच्या 14 पैकी 10 सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील, कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, जगदीश शेट्टर, के. एस. ईश्वराप्पा, आर. अशोक, सी. टी. रवी, अरविंद लिंबावळी आदी नेते बैठकीत भाग घेतले होते. कार्यकारीणीसाठी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, केंद्रिय मंत्री पल्हाद जोशी, पक्षाचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदींसह अनेक नेते बेळगावात दाखल झाले आहेत.
सध्या ग्राम पंचायत निवडणूक, मंत्री मंडळ विस्तार व गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेले मुळ कार्यकर्ते व उपरे या वादावर कार्यकारीणीत चर्चा होण्याची शक्मयता असून पक्षाचे कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग व मुख्यमंत्र्यांमध्ये शुक्रवारी चर्चा झाली आहे. मंत्री मंडळ विस्तारासंबंधी हायकमांडने दिलेला संदेश अरुणसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पोहोचविले असल्याची माहिती मिळाली आहे.
औक्षण करुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, उमेश कत्ती आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. पक्षाचे प्रभारी अरुण सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपसाठी कर्नाटक महत्वाचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मंत्रीमंडळ विस्तारासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. हायकमांडने जो संदेश दिला आहे त्या विषयी कोअरकमिटीमध्ये चर्चा होणार आहे. सार्वजनिकरित्या चर्चा करणे शक्मय नाही, असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ग्राम पंचायत निवडणूका व पक्षसंघटन या विषयी चर्चा होणार आहे. मंत्रीमंडळ विस्तारासंबंधी आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान माजी खासदार रमेश कत्ती यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांची भेट घेवून बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चर्चा केली आहे.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, ग्राम स्वराज्य मेळावे यशस्वी झाले आहेत. दरमहा कोअरकमिटी व कार्यकारीणीची बैठक होते. त्यामुळे यात काही विशेष नाही, असे त्यांनी सांगितले. तर राज्यातील 80 टक्के ग्राम पंचायतींवर भाजप प्रणीत उमेदवार निवडून येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
बळजबरीने बंद नको मराठा विकास महामंडळाला विरोध करण्यासाठी कन्नड संघटनांनी शनिवारी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. हे चुकीचे आहे. बळजबरीने बंद केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. वाटाळ नागराज घरातून बाहेर पडले की बंद बंद असे म्हणतच बाहेर पडतात. लोक संकटात आहेत. अशा परिस्थितीत बंद योग्य नाही, असे महसुल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले









