मंत्री रामदास आठवले यांच्याकडुन युवराज काटरे यांना आदरांजली
वार्ताहर/ कराड
आरपीआयच्या माध्यमातुन चळवळीत काम करीत असलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या कार्यकर्त्यांनीच दिल्लीत पाठवले. यात आरपीआय कराड दक्षिणचे अध्यक्ष युवराज काटरे यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे युवराजच्या निधनानंतर युवराजच्या कुटुंबाच्या मागे संपुर्ण आरपीआयचे कुटुंब उभा आहे. अशा शब्दात केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी युवराज काटरे यांच्या कुटुंबीयांना धिर देत त्यांचे सांत्वन केले.
आरपीआयचे (आठवले गट) कराड दक्षिणचे अध्यक्ष युवराज काटरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आरपीआयच्या वतीने शनिवारी स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय समाजीक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रियदर्शनी उद्दोग समुहाचे अध्यक्ष अशोकराव पाटील, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाअध्यक्ष अशोकराव गायकवाड, पर्यावरण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय ढमाळ, जिल्हाअध्यक्ष नितीन आवळे, कोल्हापुर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे, युथचे जिल्हाअध्यक्ष जयवंतराव विरकायदे, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड आदींची प्रमुख उपस्थीती होती. दरम्यान मंत्री रामदास आठवले यांनी युवराज काटरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
रामदास आठवले म्ह्णाले की, युवराज काटरे हा धडाडीचा कार्यकर्ता होता. आरपीआयच्या माध्यमातुन काटरे यांनी समाजातील गोरगरीब जनेतचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. त्यांच्या निधनामुळे आरपीआयने एक चांगला कार्यकर्ता गमावला आहे. सातारा दौऱयावर आल्यानंतर नेहमी समोर येणारा युवराज काटरे यापुढे दिसणार नसल्याचे दुख मनाला होत आहे. मात्र जिल्हाअध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या माध्यमातुन युवराजचा मुलगा सागर काटरे याच्यावर आरपीआय संघटना वाढवण्याची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यमुळे युवराजचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. असे मंत्री रामदास आठवले म्ह्णले.
आनंदराव पाटील म्हणाले की, कुठल्याही पक्षाचा अथवा संघटनेचा कार्यकर्ता घडायला अनेक वर्षे लागतात. त्याप्रमाणे युवराज काटरे यांनी रस्त्यावरील चळवळीत काम करूण स्वताचे व्यक्तीमत्व घडवले होते. समाजातील तळागाळातील घटकांसाठी आरपीआय संघटनेच्या माध्यमातुन लढा दिला असे आनंदराव पाटील म्ह्णाले. यावेळी, अशोकराव गायकवाड, आशोकराव पाटील, प्रा. शहाजी कांबळे, विजय ढमाळ व पदाधिकाऱयांनी आदरांजली अर्पण केली.
महापालिका निवडणुकीत भाजपा सोबत-रामदास आठवले
राज्यात होऊ घातलेल्या मुंबईसह सर्वच महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याची भुमिका आरपीआयने घेतली असल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. ते म्ह्णाले की, मुंबईत दलित मतांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे आरपीआय भाजपासोबत असेल तर भाजपाला चांगला फाया होईल. सत्ता आल्यानंतर मुंबईतील झापडपट्टीचा विकास, पाणी व पर्यावरणाबाबत चांगला कार्यक्रम हाती घेण्यात येईल.
शेतकरी कायद्या विरोधत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्ह्णाले की. सरकार शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. शेतकऱयांनी कायद्यात सुधारणा सुचवावी. सरकार सुधारणा करण्यास तयार आहे. मात्र केलेले कायदे मागे घेता येणार नाहीत. कारण जर हे कायदे मागे घेतले तर प्रत्येक कायद्याच्या विरोधात आंदोलने होतील व तेही कायदे मागे घ्यावे लागतील. त्यामुळे नविन कायदे करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी आंदोलन मागे घेऊन सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. ईडी व इन्कमटॅक्स या स्वतंत्र संस्था आहेत. जिथे अनियमितता आढळते तीथे या संस्था चौकशी करातात. त्यामुळे सरकारचा याच्याशी संबंध नाही. तसेच अकसापोटीही अशी कारवाई करण्यात येत नाही. असे रामदास आठवले म्ह्णाले.









