प्रतिनिधी / पंढरपूर
कार्तिकी वारीमध्ये असलेल्या प्रस्तावित संचारबंदी बाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा. तसेच प्रवासी सेवा बंद करणे योग्य होणार नाही. असा अभिप्राय महाराष्ट्र शासनाच्यावतीने कार्यासन अधिकारी सु.प. साळुंके यांनी एका परिपत्रकाद्वारे कार्तिकी वारी संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी दिला. त्यामुळे कार्तिकी वारी संदर्भातील सर्व निर्णय आता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पाठवले आहेत.
कार्तिकी वारीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने राज्य शासन आकडेवारी संदर्भातील एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मंदिर समितीच्या या प्रस्तावावर नुकताच शासनाने समितीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वारीतील विविध निर्णयासंदर्भात अभिप्राय कळवला आहे. यामध्ये प्रवासी सेवा बंद ठेवणे योग्य होणार नाही. असा अभिप्राय नोंदविला गेला आहे. प्रत्यक्षात प्रशासनाच्यावतीने 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर एसटी सेवा बंद ठेवावी. असा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रवासी वाहतूक सेवेसंदर्भात दिलेला अभिप्राय हा आता एसटी बससेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
तसेच शासनाने दिलेल्या अभिप्राय अनुसार संचारबंदी , पंढरपूरच्या मठांमधील वारकऱ्यांचे वास्तव्य, तसेच वारकऱ्यांचे नैमीत्तिक कार्यक्रम याबाबत निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्तिकी वारी बाबतचे सर्व निर्णय आता सोलापूर जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात येऊन पोहोचले आहेत. मध्यंतरी वारकरी संप्रदायाशी जिल्हाधिकार्यांनी कार्तिकी बाबत चर्चा केली होती. यावेळी वारकर्यांच्या काही मागण्यांवर जिल्हाधिकारी सकारात्मक होते. त्यामुळे जिल्हाधिकारी आता कार्तिकी वारी संदर्भात कुठला निर्णय घेतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामध्ये पोलिस विभागाने दिलेले प्रस्ताव जर मंजूर झाले. तर निश्चितच पंढरपूर मध्ये संचारबंदी अटळ असणार आहे.
तसेच कार्तिक वारी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा आचारसंहितेचे पालन करुन व्हावी. असेही या अभिप्रायामध्ये नमूद केले आहे.
विठोबाचे केवळ कळसदर्शन
कार्तिकी यात्रेमध्ये विठोबाचे केवळ कळस दर्शन असणार आहेत. मंदिर जरी खरे असले तरी ऑनलाईन बुकींग पद्धतीने आता भक्तांना मुखदर्शन घेता येणार नाही. तसेच चंद्रभागा सणाविषयी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत. असाही अभिप्राय महाराष्ट्र शासनाकडून मंदिर समितीस कळविण्यात आला आहे.









